Kashti Gram Panchayat | काष्टी ग्रामपंचायत
  • 9096546001, 7387424548
  • ग्रामपंचायत कार्यालय, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र - 414701

Office Address

ग्रामपंचायत कार्यालय, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र - 414701

Phone Number

+91-9096546001,
+91-7387424548

Email Address

grampanchayatkashti@gmail.com
grampanchayatkashti@gmail.com

01-08-1928

The Gram Panchayat
was established on

Shape
ग्रामपंचायत माहिती

काष्टी ग्रामपंचायत - एक दृष्टिकोन

  • लोकसंख्या: १४,८०३ (पुरुष: ७६६१, महिला: ७१४२)
  • क्षेत्रफळ: ३०९६.४५ हेक्टर
  • प्रभाग (वार्ड): ६
  • वाड्या / वस्त्या: ११

गावाचे नाव “काष्टी” नदीवरून पडले आहे, जी गावाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. येथे विष्णूपद मंदिर आहे जेथे भगवान विष्णूचे पावले आहेत. गावात स्वयंभू मानकेश्वर महादेव मंदिर आणि भूयारी मार्ग आहे. गावाची लोकसंख्या १४,८०३ असून क्षेत्रफळ ३०९६.४५ हेक्टर आहे. दर शनिवारी प्रसिद्ध आठवडे बाजार भरतो.

काष्टी ही श्रीगोंदा तालुक्यातील एक प्रगतशील आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ग्रामपंचायत आहे. इथे ०१ ऑगस्ट १९२८ रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावाच्या उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या नदीवरून ‘काष्टी’ हे नाव पडले. या नदीच्या तीरावरच विष्णूपद मंदिर आहे जिथे भगवान विष्णूच्या पावन पावलांचे ठसे आहेत.

गावामध्ये स्वयंभू हेमाडपंथी मानकेश्वर मंदिर आहे, ज्यातून भूमिगत मार्ग थेट घोडनदीला जातो. गावाचा धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा इथल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे.

भौगोलिक व सामाजिक माहिती:

  • लोकसंख्या: १४,८०३ (पुरुष: ७६६१, महिला: ७१४२)

  • क्षेत्रफळ: ३०९६.४५ हेक्टर

  • भाषा: मराठी

  • प्रभाग (वार्ड):

  • वाड्या / वस्त्या: ११

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • काष्टी येथे दर शनिवारी प्रसिद्ध आठवडे बाजार भरतो, जिथे जनावरे, भाजीपाला, अन्नधान्य यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते.

  • शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि व्यापार ही गावकऱ्यांची प्रमुख उत्पन्नाची साधने आहेत.

  • आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी सोसायटी येथे कार्यरत आहे, तसेच २१ बिगर शेती पतसंस्था सक्रिय आहेत.

  • गावात २४ अंगणवाड्या, १४ शाळा, २ कॉलेज, २५ मंदिरे, १० दवाखाने, आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

काष्टी ही गाव स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक एकात्मतेमध्ये आदर्श ठरत आहे.

About Us

ग्रामपंचायत काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे. पारदर्शक प्रशासन, जनसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही गावकऱ्यांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो.

Yojna List

  • प्रधानमंत्री आवास योजना
  • जल जीवन मिशन
  • स्वच्छ भारत मिशन
  • आयुष्मान भारत
  • महात्मा गांधी रोजगार गारंटी योजना
  • महिला व बाल कल्याण योजना
  • १५ वित्त आयोग इत्यादी

Copyright © 2025 Kashti Gram Panchayat Office | All Right Reserved | Design & Developed by IT Tech Pune